service history भरताना पूर्वीची एखादी शाळा बंद झाली असेल तर अशा शाळेची माहिती भरता येत नाही.तर अशा शाळेसाठी स्कूल not available चा ऑप्शन आठवडाभरात दिला जाणार आहे. अशा प्रकारे अशा शाळांची माहिती सर्विस history मध्ये भरता येणार आहे.
शिक्षणसेवक कालावधीमध्ये काही कारणाने जर 3 वर्षाचा कालावधी वाढला असेल तर काळजी करण्याची गरज नाही.त्या वाढलेल्या कालावधीसह शिक्षणसेवक कालावधी सिस्टम मध्ये स्वीकारला जाईल
जर लागू नसेल तर not applicable च ऑप्शन दिला जाणार आहे.
subject tought मध्ये विषय भरण्याचे काम चालू आहे.येत्या 2 दिवसात सब्जेक्ट दिसणार आहे
जर शिक्षक अपंग नसेल तर ती स्क्रीन त्या शिक्षकाने भरू नये. status मध्ये ती स्क्रीन पेंडिंग दिसणार नाही आहे याच्यावर देखील काम चालू आहे.2 दिवसात ते पूर्ण होईल
स्टाफ पोर्टल मध्ये ज्या ज्या ठिकाणी certificates ची स्कॅन केलेली प्रत अपलोड होत नव्हती ती समस्या दूर झालेली आहे.सर्टिफिकेट अपलोड केल्यावर जरा वेळ थांबावे आणि मग पुढील माहिती भरावी
क्वॉलिफिकेशन मध्ये grade हा ऑप्शन भरणे बंधनकारक नाही आहे.तो ऑप्शन blank ठेवला तरी चालू शकेल. जर grade भरायचे असतील तर कॅपिटल मध्ये A,B,C,D अशी माहिती भरावी.
नोकरीला लागताना selection हे open मधून झाले परंतु त्यांची caste इतर कोणत्याही प्रवगातील असेल तर अशा शिक्षकांचीदेखील जातीची माहिती भरणे बंधनकारक आहे
NT सारखा काही जातीचा उल्लेख चुकून वेगळ्या प्रवर्गात झालेला आहे अथवा कोठेच केलेला दिसून येत नाही..2 दिवसात याबाबत मार्गदर्शन मिळेल
CTC सारख्या डी.एड समकक्ष असलेल्या पात्रतेची नोंद व्यावसायीक पात्रतेमध्ये घेतली जाणार आहे
पर राज्यातील रहिवासी ज्यांची जात त्यांच्या राज्यात कोणतीही असेल तरीही महाराष्ट्रात नोकरी करताना त्यांची गणना open प्रवर्गातून होते. त्यांनी त्यांची जात ही open/ general मध्येच करावी.ग्रंथपाल सारख्या अर्धापगारी कर्मचार्यां च्या pay scale ची माहिती update करायचे काम चालू आहे.त्यांनी वाट पहावी
मान्यताप्राप्त विद्यापीठांची नावे जी पोर्टल ला दिसत नाही ती नावे अपडेट होणार आहे.
तेलगू/तामिळ मातृभाषा उद्या पोर्टल ला अॅड होणार आहेत.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा