सोसायटी मार्च २०२०

Example

Welcome

शुक्रवार, १ मे, २०१५

बाल आनंद मेळावा



उपक्रमाचे नाव      :-   बाल आनंद मेळावा एक अभिनव  जत्रा

                    अशी आमची महाळुंगे शाळा
                     लाविते लळा जसा माऊली बाळा

उपक्रमाचे नाव  बाल आनंद मेळावा म्हणजे एक अभिनव जत्रा
आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक असणार आहेत. देशाची भावी पिढी आहे. म्हणून उपक्रमातून शिक्षण देणे. काळाची गरज आहे.
उपक्रमची माहिती:-
जत्रा म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न,खेळ,खरेदीतून अभ्यासाची सर्वांना समान संधी.
    सर्व विषयांचा यात समावेश होतो.विद्यार्थी वेगवेगळे स्टॉल मांडून सादरीकरण करतात उदा.भाषा: शब्दांची बाग ,लोहचुंबक खेळ ,चक्रखेळ


         टप्पा उडी/पाढे खेळ खेळताना

·         गणितअपूर्णांक,टप्पाउडी,टॅनग्रॅम ,बेरजेचे झाड
·         विज्ञानवासावरुन मला ओळखा ,या खोक्यात दडलयं काय
·         इतिहास भूगोल:-.शा.-नकाशा खेळ,सनसनावळ.
·         कलाडुलनारी बाहुली ,विदुषकाच्या नाकाला टिकली.
·         कार्यानुभवकाडयाची कोडी, सायकल वर झुरमुळा करणे अशाप्रकारे सर्वच विषयांना स्पर्श.

शाळा व्यवस्थापन समितीकडून बक्षीस स्विकारताना शाळेचे विद्यार्थी
उपक्रमाचे वेळापत्रक:-
प्रत्येक सत्रात किमान एकदा
उपक्रमाचे स्वरुपपूर्वतयारी
1) प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांचे गट करावे
2)आठ दिवस अगोदर पासून कशाचा स्टॉल मांडणार त्याची तयारी करावी.
3)प्रत्यक्ष स्टॉलवर सादरीकरण किंवा खरेदी विक्री केली जाते.
4)या उपक्रमाचे स्वतंत्र अलबम ठेवलेले आहेत.
उपक्रमास लागणारे साहित्य:-
पेंट,ब्रश,प्लायऊड,कार्डशीट,टेबल,खाऊसाठी लागणारे साहीत्य.
सादरीकरण :-
गटाने किंवा वैयक्तिक स्टॉल मांडणे,प्रयोग सादर करणे, साहित्याची विक्री करणे.


प्रत्यक्ष उपक्रमा विषयी थोडेसे :-
   जत्रा म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न याचा फ़ायदा घेऊन हा उपक्रम आम्ही शाळेत राबवतो .विद्यार्थी जत्रे प्रमाणेच स्टॉल उभारतात प्रयोगाबरोबर भेळ पाणीपुरी ,वडापाव,सरबत ,ऊसळ,पॅटीस ,फ़ुगे,भाज्या . स्टॉल लावतात.
आमच्या शाळेत सर्व राज्यातली मुले आहेत.त्या त्या राज्यातला मेनू ही चाखायला मिळतो. पालकसुध्दा त्यांना मदत करतात शिवाय गुंतवलेल्या भांडवला पेक्षा दुप्पट फायदा त्याना होतो.हिशोब शिकतात.

                 यशस्वी म्हणून जगायला
                  अंगी मोठी चिकाटी हवी
                          जिथे उभे असू तिथून
                          आभाळ पाह्ण्याची दष्टी हवी
ओझ्याविना शाळा पण सर्व विषयांचा परीस्पर्श आहे की, नाही उपक्रमाची गंमत.

उपक्रमाचे शै. महत्व :-
सर्वांना संधी मिळते ,व्यावसायाभिमुख शिक्षण ,मनोरंजकता येते. संभाषणकला, आनंदायी वातावरण शाळेत येऊन जत्रेचा अनुभव शिवाय बक्षिस मिळते.
या उपक्रमासाठी सर्वच शिक्षक, विद्यार्थी, पालक, व्यवस्थापन समिती सर्वांचे सहकार्य लाभते त्यामुळे उपक्रम यशस्वी होतो.
व्यवस्थापन समिती अभिप्राय :-
हा उपक्रम अतिशय आवडला स्टॉलवरील मुलांनी बनवलेले प्रयोग,खाद्यपदार्थ पाहुन आनंद वाटला.
केंद्र प्रमुख यांचा अभिप्राय :-
हा उपक्रम मी  स्वत: पाहिला. मुलांनी हसतखेळत शिक्षण घेतले कतिला वाव मिळला असा उपक्रम निश्चितच फलदायी आहे.
आशा प्रकारे हा उपक्रम वर्षातुन दोनदा प्रत्येक सत्रात एकदा राबवला जातो.
शेवटी म्हणवे वाटतं .
               हि आवडते मज मनापासूनी शाळा
               लाविते लळा ही जसा माऊली बाळा
                        येथे उपक्रमाचे घ्या धडे
                       मग देश कार्य करण्यास व्हा पुढे
               मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा
                  जी देशासाठी तयार करीते बाळा”.
देशाची भावी पिढी आहे म्हणून उपक्रमातून शिक्षण देणे काळाची गरज आहे.
                             

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: