सोसायटी मार्च २०२०

Example

Welcome

रविवार, २६ एप्रिल, २०१५

माझा नवोपक्रम



प्रस्तावना:- सर्वांना शिक्षक दिनाच्या मनापसुन शुभेच्छा उपक्रमांचे संकलन प्रसिध्दी या माध्यमातून दिली जाते सर्वानाच प्रेरणा देणारा या उपक्रमाचे आयोजन करणार सर्वमान्यवरांचे मना पासुन आभार
उपक्रमाचे नावसंगणकावरुन शिक्षण म्हणजे आनंददायी शिक्षण
आजचे विद्यार्थी देशाचे उद्याचे आधारस्तंभ आहे.सध्याचे युग संगणकाचे युग आहे. म्हणून संगणकावर शिक्षण देणे आपले कर्तव्य आहे.असे मला वाटते.खर तर
                आयुष्य म्हणजे संगणकावर बसणं
                सेफ टाईम पाहून ऑन ऑफ करणं
                     मन असत इवला माऊस
                     त्याच्या हाती क्लीक करणं
                हर घडी हर राईट्स त्याच्या कडे ठेवणं
मित्रांनो जर आपण कोणती गोष्ट मनावर घेतली .तर अशक्य गोष्टसुध्दा आपण शक्य करु शकतो.
   हे माझ्या उपक्रमातून तुम्ही पहालच.
            
                      विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. लोखंडे सर
उपक्रमाची माहिती:-
Ø  सर्वांना समान संधी
Ø  सर्व विषयांचा अभ्यास करणे शक्य.
Ø  प्रत्येक विषयात  ,प्रत्येक पाठ, प्रत्येक पाठात प्रस्तावना ,खेळ,स्वाध्याय असे टप्पे आहेत.
शिवाय मुले स्वत: कती करुन स्वत: शिकतात.
उपक्रमाचे वेळापत्रक :-इयत्ता 5 .वी .
सोमवार
मंगळवार
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार
भाषा
गणितसेमी
विज्ञानसेमी
हिंदी
इंग्रजी
.शास्त्र
खेळ
खेळ
शा.शि.
कार्यानुभव
कला
विपाश्यना

विद्यार्थ्यांचा अभ्यास पाहून कौतुक करताना प्र.मुख्या. सौ.शिंदे मॅडम
उपक्रमाचे स्वरुपपूर्वतयारी
1)  वर्गातील 6 विद्यार्थ्यांचे गट करावे.
2) दररोज गट प्रमुख बदलुन सराव घेणे.
3)दररोजच्या अभ्यासक्रमावर आधारीत
4)विद्यार्थी प्रत्यक्ष कती करतात.
5) सादरीकरणाची तयारी
6)वर्गाची  माहिती तयार करताना विद्यार्थी सहभाग

उपक्रमास लागणारे साहित्य :- कॅम्प्युटर, लॅपटॉप, सी.डी .
सादरीकरण :-विद्यार्थी गटाने किंवा वैयक्तिक सादरीकरण करु शकतो.
प्रत्यक्ष उपक्रमा विषयी थोडेसे:- संगणक या  शब्दाबाबत प्रथम आपल्या मनात भीती होती .एम.एस.सी.आय.टी केले परंतू प्रत्यक्ष संगणकाला हाताळायचे मग काय होईल अशी भीती असे पण स्वत: लॅपटॉप घेतला प्रथम स्वत:चे ज्ञान अद्यावत करण्याचा प्रयत्न केला सराव केला. मग वर्गातील मुलांना आतापासूनच ज्ञान दिले. तर ते नक्कीच यात पारंगत होतील .कदाचित कॅम्प्युटर तज्ञ,आय. टी. इंजिनिअर होऊ शकतील. असा मला विश्वास आहे. त्या साठीचा एक भाग म्हणून माझ्या सहकार्याने स्टॅनले ब्लॅक डेकॉर कंपनीकडून 7 संगणक संच मिळवले. त्याच प्रमाणे ग्रामपंचायत यांच्याशी पाठपुरावा करुण ग्रामपंचायतकडून 1,20,000   रु .किंमतीचे .लर्निंग संच मिळवला
मुलांना स्वत: ची माहिती संगणकावर तयार करणे, इंग्रजी वाक्य तयार करणे,पेंट,वर्ड मध्ये फ़ाईल तयार करणे, इयत्तेचा अभ्यासक्रमाचा सराव करणे,.गोष्ट आवडीने करतात. महाळुंगे गावातील पहिला इयत्ता  5 वीत एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण होणारा विद्यार्थी माझ्या वर्गातील असल्याचा मला अभिमान आहे.
उपक्रमाचे शैक्षणिक महत्व :-सर्वांना संधी मिळते
·         शिक्षणात मनोरंजकता येते.
·         पुस्तकाशिवाय ज्ञान मिळते.
·         आनंददायी वातावरणात शिक्षण.
·         अवांतर पुस्तकांचे वाचन करता येते.
व्यवस्थापन समिती अभिप्राय :-
संगणक काळाची गरज ओळखून श्री.लोखंडे सर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. इयत्ता 5 वी तील विद्यार्थी एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण होतो .या बद्द्ल आनंद होतो.सरांचे सर्वांतर्फे अभिनदंन
केंद्र प्रमुख यांचा अभिप्राय :-
    हा उपक्रम मी स्वत: पाहिला.मुलांनी हसत खेळत शिक्षण घेतले. मुले सहजतेने संगणक हाताळतात.अभिषेक धनगर हा विद्यार्थी एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण होणे हा आमच्या केंद्राचा अभिमान आहे.
अशा प्रकारे हा उपक्रम अतिशय फलदायी आहे.
शेवटी म्हणावे वाटतं
            चालण्यासाठी वाट असते | वाटेसाठी चालणं नसतं
            उंच भरारी मारणा-याला | आभाळाचं भान नसतं

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

भाग्यश्री आढळराव
आपल्या कार्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन . आपण मराठी शिक्षक, शिक्षक, व विद्यार्थी यांच्यासाठी करत असलेल्या अविरत प्रयत्नाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आपण सुरु केलेल्या कार्याची वाट अशीच तेवत राहो आम्हालाही मार्गदर्शन लाभावे एवढीच अपेक्षा.