सरल अपडेट
१)
आज मध्यरात्री १२
वाजेपर्यंत जी विद्यार्थी माहिती सरल विद्यार्थी पोर्टल मध्ये भरली जाणार आहे ती
या वर्षीच्या संचामाण्यता साठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.मध्यरात्री नंतर देखील
विद्यार्थी माहिती भरता येणार आहे परंतु त्यानंतर भरलेली माहिती संचामाण्याता साठी
ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे अशी सुचना आजच्या व्ही सी मध्ये देण्यात आलेली
आहे.त्यामुळे आज १२ वाजेपर्यंत जेवढी होयील तेवढी माहिती विद्यार्थी पोर्टल मध्ये
भरावी असे आवाहन करण्यात येत आहे. भरण्यात न येणारी माहितीमुळे जर आपल्या शाळेच्या संचामाण्यातेवर
परिणाम झाला तर यासाठी शाळा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
२)
उद्यापासून ४ विभागात
पायाभूत चाचणीचे गुण offline भरण्याची सुविधा चालू करण्यात येणार आहे.यामध्ये
नासिक,औरंगाबाद,अमरावती,नागपूर हे विभाग उद्यापासून चाचणीचे गुण भरू शकणार आहेत.हे
गुण भरताना student पोर्टल ला जायचे आहे.त्यामध्ये login न करता ही माहिती भरायची
आहे. STUDENT पोर्टल मध्ये आपण ज्या ठिकाणी login करतो त्या login बाहेरच्या पेज
वर download excel या बटनावर क्लिक करून baseline select करावे आणि student
च्या पायाभूत चाचणीच्या गुणांची नोंद
भरण्याची यादी ही download करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.ही यादी
gender निहाय आणि अल्फाबेटीकली अशा दोन प्रकारे download करण्याची सुविधा दिली
जाणार आहे.ती यादी download करावी आनि गुण भरावे व पुन्हा ही यादी upload करायची
आहे.download जवळच upload ची सुविधा दिली जाणार आहे.सदर यादी download करताना
शाळेचा udise no आणि PASSWORD अचूक असणे खूप महत्वाचे आहे.अन्यथा विद्यार्थ्यांचे गुण
system मध्ये भरले जाणार नाही.ही यादी वर्गनिहाय वेगवेगळी download आणि upload
करायची आहे.upload केलेली यादी ही त्याच दिवशी न दिसता आपल्या acount ला दुसऱ्या
दिवशी आठवा २ दिवसानानंतर update झालेली दिसेल.त्यामुळे गुणांची नोंद झाली नाही म्हणून
गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही.सदर प्रोसेस ही ऑफलायीन आहे.याची नोंद घ्यावी.हे
गुण फक्त मुख्याध्यापकाच्या आय डी आणि password ने भरले जाणार आहे.आपले गुण नोंद
झाले की मुख्याध्यापकाच्या mobile वर message देखील प्राप्त होतील की नोंद झाली
अथवा नाही.जर आपण यादी download करताना udise
नंबर अथवा password चुकीचा भरला तर upload केल्यावरदेखील आपल्या गुणांची नोंद
होणार नाही याची नोंद घ्यावी.इतर विभागासाठी दिल्या जाणाऱ्या तारखा ह्या २८
तारखेला कळविल्या जातील.
३)
शिक्षक माहिती देखील लवकरात
लवकर पूर्ण करायची आहे जरी यासाठी अंतिम तारखा जाहीर झाल्या नसतील तरीदेखील.कारण
हि माहिती सामायोजानासाठी लागाणार आहे.यामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता
प्रशासनाने एक वेगळी शक्कल लढविली आहे.शिक्षक माहिती भरताना जी महत्वाची माहिती
आहे ती सध्या तूर्तास भरायची आहे आणि finalized करायची आहे.यामध्ये एकूण ६
प्रकारची माहिती प्राधान्याने पूर्ण करायची आहे.त्या महत्वाच्या बाबी अथवा मुद्दे
कोणते हे स्टाफ च्या पोर्टल वर सांगण्यात येणार आहे.या महत्वाच्या मुद्द्यांना
लक्षात येण्यासाठी वेगळा रंग देण्यात येणार आहे म्हणजे आपल्या त्या महत्वाच्या
बाबी लगेच लक्षात येतील.त्या बाबीची पूर्तता करून finalized केल्यावर उर्वरीत माहिती
भरायची आहे आणि ती सुद्धा finalized करायची आहे.त्यामुळे स्टाफ मध्ये ज्या बाबी
दिसत नव्हत्या आठवा save होत नव्हत्या ते प्रश्न आता उद्भवणार नाही.कदाचित ही
माहिती आपणास उद्या अथवा परवा स्टाफ पोर्टल ला दिसेल.
४)
शाळा माहिती लवकरात लवकर
पूर्ण करावयाची आहे.ज्या शालेंची माहिती finalized झालेली आहे त्या शाळेची माहिती
cluster level वरून finalized करायची आहे.आणि गटशिक्षणाधिकारी यांनी देखील cluster
level वरून आलेली माहिती तपासून finalized करायची आहे.शाळा आणि cluster level वरून
संपूर्ण माहिती finalized केल्याशिवाय सदर माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्या login
ला पहायला मिळत नव्हती परंतु आता ही माहिती पाहता येणार आहे.आणि त्यांना हवी ती
स्क्रीन रिजेक्ट देखील करता येणार आहे.
५)
नवीन शाळा स्थापन झालेली
असेल तर त्यांना मागील वर्षांची माहिती भरता येत नव्हती त्यामुळे त्यांचे काम
थांबले होते परंतु उद्यापासून नवीन शाळेना आता शाळा माहिती भारता येणार आहे.अशा
शाळेनी मागील वर्षाची माहिती भरू नये याची नोंद घ्यावी.नाही भरली तरी अशा शाळा
finalized करता येतील.
६)
या वर्षीच्या नवीन शाळांची
विद्यार्थी माहिती भरताना तुकडी तयार करता येत नव्हती.आता त्या error मध्ये
सुधारणा करण्यात आलेली आहे.आता तुकडी तयार केली जाऊ शकते.ती सुविधा चालू झालेली
आहे.
७)
जर शाळेत एकाच मुलाची
माहिती दोनदा नोंदली गेली असेल तर त्या २ नावापैकी एक नाव delete करून टाकायचे
आहे.ही प्रोसेस देखील मध्यरात्री पर्यंत करायची आहे.आपल्या शाळेत असे दोन वेळा नाव
नोंद केले गेलेले आहे अथवा नाही ही मुख्याध्यापकाच्या login ला दिसणार आहे.जर एकाच नाव हे जिल्ह्यात २ ठिकाणी नोंदले
गेले असेल तर अशा मुलांचा शोध हा शिक्षणाधिकारी यांच्या login ला लागणार आहे.अशा
मुलांपैकी मुलगा नेमका कोणत्या शाळेत आहे याची शहानिशा करून ज्या शाळेत तो मुलगा
जातो त्या शाळेत त्याला ठेवला जायील आणि दुसर्या शाळेतून तो विद्यार्थी काढला
जायील.
८)
ज्या शिक्षकांची नावे फक्त
udise मध्ये आहे अशा शिक्षकांची जर जन्मतारीख चुकली असेल तर अशा तारखा
गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दुरुस्थी साठी न्व्हते परंतु आता ते करता यावे यासाठी
login ला एक change in database या अर्थाचा एक फॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे.
९)
निमशिक्षकांची माहिती
भरण्याचे अधिकार मात्र शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.अशा शिक्षकांनी
मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावयाचा आहे.यात विलंब होऊ देऊ नये याची
नोंद घ्यावी.
१०)
आता फक्त शालार्थ ने देखील
map करता येऊ शकणार आहे.यामुळे बर्याच शिक्षकांची माहिती भरता येणार आहे
११)
आपल्या शाळेतील किती
विद्यार्थ्यांची माहिती भरली गेलेली आहे ही माहिती आता एका बटनावर क्लिक केले की
समजणार आहे.ही माहिती वर्ग आणि तुकडी नुसार देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.अशी
सुविधा student पोर्टल ला देत आहे असे समजलेले आहे.
१२)
मा.शिक्षणाधिकारी यांनी
संस्था नोंदणी प्राधान्याने करायचे आहे.त्यामुळे संस्थांनी आपली संस्था नोंद करून
घ्यायची आहे.संस्था नोंद जर केली नाही तर इतर माहिती स्वीकारली जाणार नाही.याची नोंद घ्यावी.
१3)
सर्वांना विनंती आहे की आपण
विद्यार्थी माहिती आज मध्यरात्री पर्यंत पूर्ण करावी आणि इतर राहिलेली माहिती ही ३० तारखेपर्यंत पूर्ण करायचा प्रयत्न करायचा
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा